SAAM MARATHI launching on 15 August at 7:00 PM, enjoy :dance:
More details about the channel can be at -
Sakal Papers International Marathi News Daily - Pune
and
Indiantelevision.com's > Regional > Sakaal Group’s GEC Saam Marathi to launch on 15 August
Hope the channel launches on
Tata Sky soon :thumbsup:
Saam
TV is coming shortly on
Tata Sky and Dish TV both. Cable TV viewers will get the channel from today itself. Formalities for DTH are in process. That news is there in today's "Sakal". :thumbsup:
http://esakal.com/esakal/08152008/SpecialnewsAF5154B254.htm
पुणे, ता. १४ - करमणुकीच्या क्षेत्रात अवतरते आहे "साम राज्य'! आजच. सायंकाळी सात वाजता. नवे कार्यक्रम, नव्या दमाचे चेहरे, नव्या रचनेची बातमीपत्रे घेऊन येत आहे "साम मराठी'! सर्वांसाठी माहिती, ज्ञान, संस्कार, करमणूक आणि आनंद घेऊन.
चोवीस तास बातम्यांमध्ये प्रेक्षकवर्ग रगडला जात असताना, नवनवे कार्यक्रम देणारी, खास मराठीपण जपणारी, "क' म्हणजे करमणुकीचाच हे ठामपणे मानून आणि जाणून वाटचाल करणारी वाहिनी आज येत आहे. "साम मराठी' अर्थात सामर्थ्य महाराष्ट्राचे. सायंकाळी सात वाजता.
ही वाहिनी इतरांपेक्षा वेगळी असेल. तिच्यावरचे कार्यक्रम मराठी मनांची आवड जाणून तयार करण्यात आले आहेत. महिला, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी या सर्वांचा विचार करून "साम'च्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. तेच तेच चेहरे पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना "साम'वरून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नव्या चेहऱ्यांची ओळख आम्ही करून देणार आहोत. "दीपस्तंभ'सारखा रोज प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आपल्या परिसरातील आदर्श व्यक्ती- संस्थांचा परिचय करून देईल. प्रेक्षकांचा छळ मांडणाऱ्या "रिऍलिटी शो'पेक्षाही प्रेक्षकांनाच कार्यक्रमात सहभागी करून घेऊन मनोरंजनाचा खेळ "साम'वर रंगेल.
राज्यात काय घडले आणि उद्या ठळकपणे नोंद घ्यावी असे काय घडणार, याचाही समावेश असलेली आणि बातमीचा थेट आपल्याशी असलेला संबंध उलगडून दाखविणारी बातमीपत्रे हे "साम'चे वैशिष्ट्य. ही बातमीपत्रेही सरधोपट पद्धतीने "साम' मांडणार नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक यांना उपयुक्त ठरतील असे विषय या बातमीपत्रांमधून हाताळले जातील. त्याशिवाय आर्थिक घडामोडी आणि क्रीडा क्षेत्रांसाठीही स्वतंत्र वेळ "साम'वर असेल. मनोरंजन विश्*वात "साम मराठी' वाहिनी "साम राज्य' निर्माण करील, यात शंका नाही.
--------------------------------------------------------
येथे दिसेल "साम मराठी'
ज्यांच्याकडे केबल आहे त्यांना आज सायंकाळपासूनच "साम मराठी' वाहिनी दिसू शकेल. टाटा स्काय आणि डिश टीव्हीवरून "साम मराठी'चे प्रक्षेपण करण्याबाबत कार्यवाही सुरू असून, लवकरच या दोन्ही डीटीएच सेवांवरून "साम मराठी' दिसू लागेल. ज्यांच्याकडे केबल आहे, पण "साम' दिसत नाही, अशांनी आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा, अथवा "सकाळ' कार्यालयात ही माहिती द्यावी.
तांत्रिक माहिती -
सॅटेलाईट इन्सॅट ४ ए, पोलरायझेशन -हॉरिझॉंटल, दिशा - ८३ अंश पूर्व, फ्रिक्वेन्सी ४०४०.५, सिंबॉल रेट-७५०० एफईसी रेशो- ७ / ८